Nashik : आता ई-बाइक कंपनीचीही नाशिकमध्ये एण्ट्री, ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

Nashik : आता ई-बाइक कंपनीचीही नाशिकमध्ये एण्ट्री, ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे
गेल्या 20-22 वर्षांत नाशिकमध्ये एकही मोठा प्रकल्प आला नसल्याची नाशिककरांची खंत रिलायन्सने दूर केली. त्यानंतर मात्र गुंतवणुकीचा ओघ सुरूच असून, रिलायन्सनंतर आणखी एक मोठा प्रकल्प नाशिकमध्ये येण्याच्या तयारीत आहे. सध्या त्याबाबतची प्रक्रिया सुरू असून, एमआयडीसीकडे 70 एकर जागेची मागणीही करण्यात आली  या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.

एका नामांकित ई-बाइक कंपनीने नाशिकमध्ये येण्याची तयारी दर्शविली आहे. या कंपनीच्या माध्यमातून तब्बल 1,200 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. रिलायन्सने 2,100 कोटींची गुंतवणूक केली होती. त्यानंतर मोठी गुंतवणूक करणारा हाच प्रकल्प असून, वर्षभरातच दुसरा मोठा प्रकल्प नाशिकमध्ये आल्याने, नाशिकच्या उद्योग जगताला मोठी कलाटणी मिळणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी एमआयडीसीकडे 70 एकरची मागणी करण्यात आली आहे. दिंडोरी, अक्राळे किंवा अजंग रावळगाव येथील औद्योगिक वसाहतीत जागा देण्याबाबत एमआयडीसीकडून प्रक्रिया सुरू झाली आहे.

नाशिक औद्योगिक वसाहतीतील भूखंडांचे दर लक्षात घेऊन कंपनी व्यवस्थापनाकडून नाशिकला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर ई-बाइकच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळही नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने, कंपनी उभारण्यासाठी सर्वच योग जुळून येत आहे. दरम्यान, ई-बाइकचा वाढता वापर लक्षात घेता ही कंपनी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. तसेच कंपनीचे उत्पादन नाशिकचा लौकिक जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविणार आहे.

वर्षभरात दुसरी मोठी गुंतवणूक

जून 2021 मध्ये रिलायन्स समूहाच्या रिलायन्स लाइफ सायन्स कंपनीने दिंडोरी येथील तळेगाव अक्राळे येथे 2,100 कोटींची गुंतवणूक केली. 161 एकरमध्ये कंपनीचा प्रकल्प उभारला जात आहे. त्या पाठोपाठ ई-बाइक कंपनीचा मोठा प्रकल्प ठरणार आहे. या कंपनीकडून 1,200 कोटींची गुंतवणूक केली जाणार असून, 70 एकरमध्ये प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच इंडियन ऑइल कंपनीकडूनदेखील जून 2021 मध्येच नाशिकमध्ये 350 कोटींची गुंतवणूक केली असून, 60 एकरमध्ये हा प्रकल्प उभारला जात आहे.

ई-बाइक कंपनी नाशिकमध्ये येण्यास उत्सुक असून, सध्या त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतील भूखंडांचे दर परवडणारे असल्याने, ई-बाइक कंपनी नाशिकमध्ये येण्यास सकारात्मक आहे. त्याचबरोबर येथील कुशल मनुष्यबळही कंपनीच्या दृष्टीने जमेची बाजू ठरत आहे. लवकरच याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
– नितीन गवळी,
प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, नाशिक

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news