नाशिक : निरंजन देवळा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश आहेर बिनविरोध

देवळा : निरंजन देवळा विकास सोसायटीचे चेअरमन योगेश आहेर , व्हा चेअरमन जिजाबाई आहेर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना सहायक निबधक सुजय पोटे समवेत संचालक मंडळ आदी ( छाया - सोमनाथ जगताप )
देवळा : निरंजन देवळा विकास सोसायटीचे चेअरमन योगेश आहेर , व्हा चेअरमन जिजाबाई आहेर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना सहायक निबधक सुजय पोटे समवेत संचालक मंडळ आदी ( छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : पुढारी वृत्तसेवा

निरंजन देवळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश शांताराम आहेर यांची तर व्हा चेअरमनपदी जिजाबाई खंडेराव आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

निरंजन देवळा विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ९ मार्च रोजी बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मंगळवारी (दि.११) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी योगेश आहेर यांचा तर व्हा चेअरमन पदासाठी जिजाबाई आहेर यांचा निर्धारित वेळेत अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. याप्रसंगी दगा आहेर, प्रदीप आहेर, रविंद्र आहेर, सुनील आहेर, दीपक आहेर, राजेश आहेर, उत्तम आहेर, दीपक निकम ,दादाजी सोनारे, विमलबाई आहेर, शांताबाई गुजरे , सचिव संदीप ठुबे आदी उपस्थित होते . नूतन पदाधिकाऱ्यांचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news