नाशिक : महिलांनी घेतला मोफत ‘दि केरला स्टोरी’चा लाभ

सिडको : येथील दिव्या ॲडलब येथे मोफत 'दि केरला स्टोरी' चित्रपटाचा आनंद अनुभवताना महिला.
सिडको : येथील दिव्या ॲडलब येथे मोफत 'दि केरला स्टोरी' चित्रपटाचा आनंद अनुभवताना महिला.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवीन सिडको येथे महिलांसाठी मोफत 'दि केरला स्टोरी' चित्रपटाचे आयोजन करण्यात आल्याने सुमारे 100 जणींनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

आजकालची युवा पिढी भरकटत आहे. त्यांची प्रेमप्रकरणात फसवणूक होत असल्याचे चित्र समोर येत आहे. आपली मुलगी, मुलगा कोणासोबत राहते याकडे पालकांनीदेखील लक्ष द्यायला हवे. आपलं किचनने हा चित्रपट दाखवल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. – ललिता निकम, गृहिणी.

ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी, देव, देश, धर्मासाठी आणि गोरगरिबांच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या आपलं किचनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नवीन सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील कार्निवाल सिनेमा दिव्या ॲडलब येथे आपलं किचनचे आयोजक अभिजित परदेशी व अनिकेत निकत यांनी शनिवारी (दि.20) 18 ते 30 वयोगटातील महिलांसाठी विनामूल्य 'दि केरला स्टोरी' या चित्रपटाचे आयोजन केले. परिसरातील सुमारे 100 महिलांनी याचा लाभ घेतला. सोशल मीडियावर सतत व्यस्त असणाऱ्या पिढीला माझे कुटुंब माझी जबाबदारी याची जाणीव व्हावी याकरिता हा चित्रपट दाखवण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन सोनवणे, शिवम तिवारी, मनोज निकम, गौरव अहिरे, प्रथमेश यांसह आदींनी परिश्रम घेतले.

'दि केरला स्टोरी' दाखवल्याबद्दल आपलं किचनचे मनापासून धन्यवाद. हा चित्रपट प्रत्येकाने बघायला हवा. आपल्या पाल्यांचे फ्रेंड सर्कल कोण आहेत, शाळा, महाविद्यालयात त्यांचे वलय कोणाभोवती फिरते हे काळजीपूर्वक पाहायला हवे. तसेच तरुणांनी प्रेम करताना समोरच्या व्यक्तीची पूर्ण माहिती घ्यावी. सावज होण्याचे टाळा – रीना शिंदे, विद्यार्थिनी.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news