नाशिक : महिला क्लस्टरसाठी सहकार्य करणार : आ. सीमा हिरे

नाशिक : उत्तर महाराष्ट्र महिला सभासदांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार सीमा हिरे. समवेत ललित गांधी, संगीता पाटील, सुधाकर देशमुख, कांतीलाल चोपडा, डॉ. धनश्री हरदास, संजय सोनवणे.
नाशिक : उत्तर महाराष्ट्र महिला सभासदांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार सीमा हिरे. समवेत ललित गांधी, संगीता पाटील, सुधाकर देशमुख, कांतीलाल चोपडा, डॉ. धनश्री हरदास, संजय सोनवणे.

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

महिला समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र चेंबरचे कार्य कौतुकास्पद आहे. महिलांना व्यापार-उदयोग सुरू करण्यात मदत करणे, त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठा तयार करणे तसेच महिला क्लस्टरसारखे विषय हाताळणे हे महिलांच्या स्वावलंबनासाठी आवश्यक असून, या सर्व कार्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन आमदार सीमा हिरे यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला उद्योजकता समितीच्या वतीने सारडा संकुल येथील बाबूभाई राठी सभागृहात आयोजित केलेल्या विशेष संवाद बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन कांतीलाल चोपडा, पर्यावरण समितीच्या चेअरपर्सन डॉ. धनश्री हरदास, को-चेअरमन संजय सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता पाटील यांनी केले. महिलांना व्यापार उद्योगासाठी असलेल्या सरकारी योजनांची माहितीचे कार्यक्रम व महिला समितीमार्फत राबविण्यात येणार असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. महिलांनी महाराष्ट्र चेंबरच्या महिला समितीच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या बैठकीसाठी जिल्ह्यातील व उत्तर महाराष्ट्रातील सर्व महिला उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news