नाशिक : दुसरी बायको करण्याच्या धमकीमुळे पत्नीची आत्महत्या

नाशिक : दुसरी बायको करण्याच्या धमकीमुळे पत्नीची आत्महत्या
Published on
Updated on

नाशिक : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने वासाळी येथील शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मैना सोळे (२६, रा. दुगारवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे.

विवाहितेचे वडील मधुकर वाघ (रा. शिरसगाव, त्र्यंबकेश्वर) यांनी सातपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मैना हिचा पती कृष्णा हा दुसरी बायको करण्याची धमकी देत असे. तसेच दारू पिऊन तिला मारहाण करीत. याच मानसिक त्रासातूनच मैना हिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पती कृष्णा व सासरे गोविंद सोळे यांच्याविरोधात सातपूर पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news