पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विद्युत ट्रान्सफार्मर मधील तांब्याच्या तारा आणि ऑईल असा दोन लाख 67 हजारांचा माल चोरटयांनी चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 12) सकाळी तळवडे येथे उघडकीस आला.
याप्रकरणी महावितरण अधिकारी निकिता इंगोले यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी मध्यरात्री ते सकाळी सहाच्या कालावधीत तळवडे येथील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, अज्ञात चोरट्याने ट्रान्सफार्मर खांबावरून खाली उतरून आतील तांब्याच्या तारा आणि ऑईल असा एकूण दोन लाख 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.