नाशिक : आठवडे बाजार रस्त्यावर भरल्याने अपघाताला आमंत्रण

नगरसूल : शुक्रवारच्या आठवडे बाजारात रस्त्यावर बसलेले भाजीविक्रेते. 
(छाया : भाऊलाल कुडके)
नगरसूल : शुक्रवारच्या आठवडे बाजारात रस्त्यावर बसलेले भाजीविक्रेते. (छाया : भाऊलाल कुडके)
Published on
Updated on

नाशिक (नगरसूल): पुढारी वृत्तसेवा
येवला आठवडे बाजारात झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती नगरसूल बाजारात घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

येवला तालुक्यातील नगरसूल येथील आठवडे बाजार हा मोठ्या प्रमाणात भरत असल्याने विक्रेत्यांची संख्या व ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी, भाजीपाला विक्रेते व इतर वस्तू विक्रेते अक्षरश: येवला नांदगाव राज्य मार्ग क्रमांक 25 च्या वळणावर रस्त्यालगत बसतात. रस्त्याच्या एका बाजूला बाजाराची गर्दी व दुसर्‍या बाजूला मोटारसायकल व चारचाकी वाहनांची गर्दी असते. हा राज्य मार्ग असून जळगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, नांदगाव या तालुक्यांतून वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यात नाशिक, नगर, शिर्डीसाठी हा मार्ग शॉर्टकट असल्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.

विक्रेत्यांना उठविण्याचा प्रयत्न केला, पण ते उठत नाही. घरी मराचे काय अन् रस्त्यावर मरायचे काय? अशी त्यांची उत्तरे आहेत. -सुदाम गादीकर, बाजार वसुली ठेकेदार.

स्थानिक भाजीपाला विक्रेते शेतकरी हे मोठ्या प्रमाणात बसतात. भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाला भरेकरी विक्रेते याच भागात गर्दी करतात. ही गर्दी पाहून नगरसूल ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी तसेच बाजार वसुली ठेकेदार व त्यांचे कर्मचारी यांनी वारंवार सूचना केल्या. पण विक्रेते त्यांना उलट उत्तर देतात, अशी स्थिती आहे. नगरसूलच्या सरपंच मंदाकिनी पाटील यांनी येवला तालुका पोलिस ठाण्याला दोन-तीन वेळा तक्रार पत्र दिले आहे. पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांच्या मदतीशिवाय हा रस्ता मोकळा होऊ शकत नाही, अशी खंत व्यक्त केली. नगरसूल आठवडे बाजारासाठी ग्रामपंचायतीने ओटे व शेड व्यवस्था केली आहे. पण विक्रेते आपले दुकान रस्त्यालगतच थाटतात. पोलिसांच्या सहकार्याने ग्रामपंचायत पंचायतीने भाजीपाला, फळविक्रेते, भत्यावाले, कपडे विक्रेते, कटलरी, मटण, चिकन, मच्छिमार, विक्रत्यांना जागा नेमून दिल्यास रस्त्यावर शेतकर्‍यांना बसण्याची वेळ येणार नाही.

नगरसूल ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीने पोलिसांच्या सहकार्याने आठवडे बाजारात रस्त्यावर बसणार्‍या विक्रेत्यांना सुरक्षित जागा देऊन संभाव्य अपघाताचा प्रकार टाळणार आहोत. -अमय पैठणकर, उपसरपंच, नगरसूल.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news