नाशिक : मांजरगावच्या थेट सरपंचपदी वंदना सोनवणे

नाशिक : मांजरगाव ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच वंदना सोनवणे व सदस्यांचा सत्कार करताना ग्रामविकास पॅनलचे बाळासाहेब सोनवणे, गणपत सानप, शिवनाथ सोनवणे, वसंत सोनवणे, सुनील सोनवणे
नाशिक : मांजरगाव ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच वंदना सोनवणे व सदस्यांचा सत्कार करताना ग्रामविकास पॅनलचे बाळासाहेब सोनवणे, गणपत सानप, शिवनाथ सोनवणे, वसंत सोनवणे, सुनील सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या लक्षवेधी असलेल्या मांजरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेब सोनवणे, भास्कर सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, शिवनाथ सोनवणे, गणपत सानप, रामनाथ सोनवणे, वसंत सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलच्या सरपंचपदी वंदना सुनील सोनवणे या बहुमताने विजयी झाल्या, तर सदस्यांच्या एकूण सात जागांपैकी चार जागा ग्रामविकास पॅनलला, दोन जागा परिवर्तन पॅनलला व एक जागा अपक्षला मिळाली आहे. यामध्ये यापूर्वी दोन जागांवर ग्रामविकास पॅनलचे दोन सदस्य बिनविरोध झालेले आहेत.

पॅनलनिहाय विजयी उमेदवार असे…

वाॅर्ड क्र. १ : १) सागर भास्कर सोनवणे (ग्रामविकास) २) मंगला कैलास गांगुर्डे (बिनविरोध ग्रामविकास) ३) सरला भाऊराव सोनवणे (परिवर्तन), वाॅर्ड क्र. २ : १) अनिता संदीप सानप (ग्रामविकास) २) शंकर गांगुर्डे (बिनविरोध ग्रामविकास) आणि वाॅर्ड क्र. ३ : १) मीरा सुरेश बोडके (परिवर्तन) व २) लहानू आंबेकर (अपक्ष).

यावेळी थेट निवडणुकीमध्ये विजयी ग्रामविकास पॅनलच्या सरपंच वंदना सुनील सोनवणे यांनी गावातील दारूबंदी, भूमिगत गटार प्रश्न, संजीवनी पेयजल योजनेमार्फत घरोघरी स्वच्छ पाणी, डिजिटल शाळा तसेच ज्या काही समस्या असतील, त्या सोडवण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी सुभाष सोनवणे, जगन सोनवणे, एकनाथ सोनवणे, सुनील सोनवणे, संदीप सोनवणे, शिवराम सानप, पांडुरंग सोनवणे, संदीप सानप, योगेश सानप, विठोबा सोनवणे, योगेश सोनवणे, डॉ. रमेश सोनवणे, नवनाथ दौंड, विठोबा बोंद्रे, दिलीप सोनवणे आदींसह ग्रामस्थांनी नवनियुक्त सरपंच व सदस्यांचे स्वागत केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news