नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आयुष्य जगत असताना आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि आत्मअनुशासन या त्रिसूत्रीचा सर्वांनी वापर करून मार्गक्रमण करणे गरजेचे असल्याचे मत, महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले.
कुलगुरू डॉ. कानिटकर यांना नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लष्करासाठी सेवेसाठी परम विशिष्ट सेवा पदक व पुणे येथील दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त विद्यापीठ परिवारातर्फे आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. श्रीराम सावरीकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी पी. एस. जाधव, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी, एन. व्ही. कळसकर, अधिष्ठाता सुशीलकुमार झा, विशेष कार्य. अधिकारी डॉ. सुबोध मुळगुंद आदी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी समन्वयन केले.