नाशिक : तहसीलदारांचे अधिकार अनधिकृतपणे वापरणे भोवले, महिला तलाठ्याची वेतनवाढ रोखली

नाशिक : तहसीलदारांचे अधिकार अनधिकृतपणे वापरणे भोवले, महिला तलाठ्याची वेतनवाढ रोखली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तहसीलदारांचे अधिकार अनधिकृतपणे वापरणार्‍या येवल्यातील महिला तलाठी इगवे यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. प्रांताधिकार्‍यांनी तसे आदेश दिले आहेत. पण प्रकरणाची व्याप्ती व झालेली कारवाई बघता, महसूल विभागात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

येवल्यातील सायगावच्या तलाठी यांनी स्टॅम्पपेपरवर परस्पर वाटणीपत्राच्या आधारे खातेदारांना वहिवाट सुरू करून मालकी हक्क प्रस्थापित करून दिले. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर मालेगावच्या अपर जिल्हाधिकार्‍यांनी प्रांतांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रांतांनी चौकशी करून त्याचा अहवाल सादर करताना 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर अनधिकृतपणे जमिनीचे बेकायदेशीरपणे वितरण केल्याचे अहवालात म्हटले आहे.

तसेच तलाठी इगवे यांंची 1 जुलै 2022 पासून देय असणारी एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश प्रांतांनी दिले आहेत. पण तहसीलदारांचे अधिकार अनधिकृतपणे वापर केल्याप्रकरणी केवळ वेतनवाढ रोखण्याची कारवाई झाल्याने महसूल विभागात चर्चांना ऊत आला
आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news