नाशिक : नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी फडकणार तिरंगा ध्वज

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी फडकणार तिरंगा ध्वज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत जिल्ह्यात पाच ठिकाणी 75 फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. या ध्वजस्तंभावर कायमस्वरूपी तिरंगा फडकविण्यात येणार आहे. ध्वजस्तंभाजवळ संविधानाच्या प्रतिकृतीची उभारणी केली जाणार आहे. जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.

15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने नागरिकांच्या मनामध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्या, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी 'हर घर झेंडा' उपक्रम हाती घेण्यात आला. त्या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या संकल्पनेमधून जिल्ह्यात पाच ठिकाणी कायमस्वरूपी ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. येत्या 10 तारखेच्या आत हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.

येथे उभारणार ध्वजस्तंभ ….
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालय
मालेगाव : पंचायत समिती कार्यालय
कळवण : तहसील कार्यालय परिसर
निफाड : नवीन प्रशासकीय इमारत
येवला : प्रशासकीय संकुलजि

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news