नाशिकरोड : श्रीरामपुरातून साडेसहा लाखांची रोकड चोरणाऱ्या तिघांना जेरबंद करणारे उपनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास लोंढे, हवालदार संजय ताजने, विनोद लखन, सूरज गवळी, पंकज करपे, राहुल जगताप, संदेश रघतवान आदी पथक. (छाया: उमेश देशमुख)
नाशिकरोड : श्रीरामपुरातून साडेसहा लाखांची रोकड चोरणाऱ्या तिघांना जेरबंद करणारे उपनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास लोंढे, हवालदार संजय ताजने, विनोद लखन, सूरज गवळी, पंकज करपे, राहुल जगताप, संदेश रघतवान आदी पथक. (छाया: उमेश देशमुख)

नाशिक : श्रीरामपुरातून साडेसहा लाख लांबविणारे तिघे गजाआड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर येथून कारची काच फोडून सुमारे साडेसहा लाखांची रोकड चोरून पसार झालेले चोरटे उपनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. विना नंबरप्लेटच्या दुचाकीमुळे हे तिघे गस्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

उपनगर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी गेल्या मंगळवारी पेट्रोलिंग करत असताना मुक्तिधाम परिसरात नंबर नसलेल्या काळ्या रंगाच्या पल्सरवरून तिघेजण संशयितरीत्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा दूरपर्यंत पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर या तिघांनाही पोलिस ठाण्यात आणून त्यांना पॉलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले. श्रीरामपूर येथील प्रभात डेअरीजवळील नीतू ढाबा येथे एका चारचाकीची मागील काच फोडून सहा लाख ४२ हजार रुपये लांबविल्याची कबुली त्यांनी दिली .या घटनेप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल आहे. लखन पवार (रा. देवी मंदिराजवळ, निफाड), श्रीनिवास बोरजे (रा.पिंपळगाव जलाल, ता. येवला), गौरव पवार (रा. कुंदेवाडी, ता. निफाड) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. उपनिरीक्षक विकास लोंढे, हवालदार संजय ताजने, विनोद लखन, सूरज गवळी, पंकज करपे, राहुल जगताप, संदेश रघतवान यांच्या पथकाने हे तिघे जेरबंद केले आहेत.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news