नाशिक : नादुरुस्त बसेसमुळे नांदगावकरांचे हाल

नांदगाव बस www.pudhari.news
नांदगाव बस www.pudhari.news

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
नांदगाव आगारातील 12 नादुरुस्त बसेसमुळे नांदगाव आगारावर गाड्यांच्या अनेक फेर्‍या रद्द करण्याची वेळ आली आहे. यामुळे बसचे वेळापत्रक कोलमडले असून, प्रवासीवर्गाला याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नांदगाव आगारातील बसगाड्यांचा रोजचा फेरा सरासरी 17 ते 18 हजार कि. मी. इतका आहे. त्यासाठी कमीत कमी 50 बसगाड्यांची आवश्यकता आहे. पंरतु सद्यस्थितीत बसगाड्यांच्या कमतरतेमुळे हा फेरा 13 हजार कि.मी.वर आला आहे. या बससेवेवर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. परंतु बस उशिरा येत असल्याने त्यांना फटका बसत आहे. नांदगाव आगारातील नादुरुस्त बसगाड्यांची लवकरात लवकर दुरस्ती करत बसगाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news