नाशिक: आजच्या तरुणाईचे असेही दातृत्व

नाशिक : तपोवन येथील वृद्धाश्रमात भोजनवाटप करताना तरुण.
नाशिक : तपोवन येथील वृद्धाश्रमात भोजनवाटप करताना तरुण.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवीन पिढी ही मोबाइल आणि सोशल मीडियाच्या जंजाळात पूर्णत: गढून गेली आहे. त्यांना वाढदिवसाच्या दिवशी निव्वळ पार्टी, मौजमजा आणि हुल्लडबाजीशिवाय काही दिसत नाही. या विचारांना फाटा देत सिडको येथील तरुणाने आपला वाढदिवस वृद्धांमध्ये रमून त्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी गोडाधोडाचे वाटप करून आनंदात साजरा केला. सिडको येथील आपलं किचन याचे अध्यक्ष अभिजित परदेशी, सदस्य रोहन बिस्ट यांच्या वाढदिवसानिमित्त गाडगे केटरर्स यांच्या संयुक्त विद्यमाने तपोवन येथील वृद्धाश्रमात पुरणपोळीसह गोडाधोडाचे अन्नदान करण्यात आले. अनिकेत निकम, चेतन सोनवणे, ललित बोरसे, शिवम तिवारी, गौरव अहिरे आदींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. तर मराठी नववर्षारंभदिनी तरुणांच्या सानिध्यात जेवण करताना आश्रमातील वृद्धांच्या चेहर्‍यावर समाधान दिसले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news