नाशिक : नांदुरी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार

अभोणा : राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते स्मार्ट ग्राम पुरस्कार स्वीकारताना सरपंच सुभाष राऊत व ग्रामसेवक पंडित महाजन. (छाया : सचिन मुठे)
अभोणा : राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते स्मार्ट ग्राम पुरस्कार स्वीकारताना सरपंच सुभाष राऊत व ग्रामसेवक पंडित महाजन. (छाया : सचिन मुठे)

नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी कळवण तालुक्यातील नांदुरी गावाला ग्रामपंचायत सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षातील तालुकास्तरीय "आर आर (आबा) पाटील सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रातिनिधिक स्वरूपात सरपंच सुभाष राऊत व ग्रामसेवक पंडित महाजन यांनी स्वीकारला.

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी आदी उपस्थित होते. पुरस्काराच्या माध्यमाने गावाला विकासकामांसाठी दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तालुकास्तरीय "आर आर (आबा) पाटील सुंदर गाव" (स्मार्ट ग्राम) पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण तालुक्यातून नांदुरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील, सहायक गटविकास अधिकारी राहुल अहिरे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष रवि ठाकरे, विस्तार अधिकारी एस. डी. महाले, युवराज सोनवणे आदींनी या स्मार्ट ग्रामसाठी परिश्रम घेतले. स्मार्ट ग्राम निवडीसाठी स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान आदींबाबतचे निकष लक्षात घेण्यात आलेले असल्याचे सरपंच राऊत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news