नगर : वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरूच | पुढारी

नगर : वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरूच

संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याहून पाठवलेली आपत्ती व्यवस्थापनची टीम बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जोर्वे पिंपरणे येथील पुलावर पोहोचली. या टीमच्या माध्यमातून शोधकार्य घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत कोणाचाही शोध लागलेला नव्हता.

संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द या ठिकाणी संदीप नागरे यांच्याकडे नाशिक येथून काचा घेऊन पिकअप आली होती. माघारी जाताना पिकअपवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे चालक प्रकाश किसन सदावर्ते आणि क्लिन्नर अमोल अरुण खंदारे व त्याचा चुलता सुभाष आनंदराव खंदारे (रा. जालना) हे तिघे वाहून गेले. क्लिनर अमोल खंदारे यांनी खिडकीतून उडी मारल्यामुळे वाचला आहे.

पिंपरणे नजीकच्या प्रवरा नदीच्या पात्रात मधोमध पुलावरून कोसळलेले वाहन असल्याची माहिती शोधकार्य करणार्‍यांनी प्रशासनाला दिली. मात्र, बरेच प्रयत्न करूनही पात्राच्या मधल्या भागातून सदरचे वाहन बाहेर काढण्यात अपयश आले आहे. वाहून गेलेला चालक आणि त्याचा जोडीदारही वाहनातच फसलेले असण्याचीही शक्यता यावेळी वर्तविण्यात आली. सदरचे वाहन बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने मोठ्या क्रेनचाही वापर केला. मात्र, त्याचाही फारसा फायदा झाला नाही. अद्यापही शोधकार्य सुरूच आहे.

Back to top button