नाशिक : ‘धरणाजवळून गाडी घेऊन जा’ असा मेसेज करून युवकाची आत्महत्या?

सतीश चंद्रभान गोसावी
सतीश चंद्रभान गोसावी
Published on
Updated on

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
'धरणाजवळून गाडी घेऊन जा', असा भावाच्या मोबाइलवर मेसेज केलेल्या तरुणाचा मृतदेह सिन्नर तालुक्यातील डुबेरेजवळील जगबुडी बंधार्‍यात आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सतीश चंद्रभान गोसावी (25, रा. पाडळी, ता. सिन्नर) हा युवक औद्योगिक वसाहतीतल्या एका कारखान्यात कामाला होता. सोमवारी सकाळी 7.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे तो दुचाकीने ड्यूटीवर निघाला होता. त्याने भाऊ किरण याला गाडी धरणाजवळून घेऊन जा, असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केला. त्यात एटीएमचा पिन नमूद केला होता. किरण याने हा मेसेज दुपारी उशीरा पाहिला व धावाधाव केली. पोलिसांना माहिती देण्यात आली. रात्री उशिरा सहायक पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र गोसावी, मच्छिंद्र पिठे, गौरव सानप यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर बंधार्‍याजवळ सतीश गोसावी याचे बॅगेत ठेवलेले कंपनीचे कपडे आणि दुचाकी मिळून आली. रात्री अंधार असल्याने शोधकार्य करता आले नाही. मंगळवारी शोधकार्य करून मृतदेह बंधार्‍यातून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी माजी सरपंच चंद्रभान रेवगडे यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सतीश याने आत्महत्या करण्यापूर्वी भावाला मेसेज केला असावा, असा अंदाज आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी पुढीलतपास करीत आहेत.

पट्टीचे पोहणारे तुपे यांची शोधकार्यात मदत
मंगळवारी सकाळी बेलू येथील पट्टीचे पोहणारे गोविंद तुपे यांना डुबेरे येथील जगबुडी बंधार्‍याजवळ पाचारण करण्यात आले. त्यांनी बंधार्‍यात शोध घेतल्यानंतर सतीष गोसावी याचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news