नाशिक : इगतपुरी शहरात रस्ते चकाकणार ;आ. खोसकर यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

बोरटेंभे : येथे प्रवेशद्वार कमानीच्या कामाचे भूमिपूजन करताना आमदार हिरामण खोसकर. समवेत गोरख बोडके, जनार्दन माळी आदी.
बोरटेंभे : येथे प्रवेशद्वार कमानीच्या कामाचे भूमिपूजन करताना आमदार हिरामण खोसकर. समवेत गोरख बोडके, जनार्दन माळी आदी.

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी शहरात प्रवेश करणार्‍या बोरटेंभे येथे प्रवेशद्वारासह नगर परिषद हद्दीत विविध विकासकामांचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

शहरातील रनिंग रूम ते शिवाजीनगर रस्ता करणे, बोरटेंभे येथे प्रवेशद्वार बांधणे, गिरणारे ते गणपती मंदिरापर्यंत रस्ता करणे, पोस्ट ऑफिस ते पटेल चौकापर्यंत रस्ता तयार करणे, सेक्रेट हार्ट येथे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, धम्मगिरीसमोरील ईदगाह बांधकाम करणे, फणसवाडी ते धम्मगिरी रस्ता दुरुस्त करणे, अरब मजिद येथे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, शिवाजीनगर येथे ग्रीन जिम तयार करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते चांदवडकर घरापर्यंत रस्ता तयार करणे, धम्मगिरीसमोरील मोठी ईदगाहाचे सुशोभीकरण करणे, जोग महाराज भजनीमठ येथे कमानीचे बांधकाम काम करणे, धम्मगिरी ते फणसवाडी रस्ता सुधारणे, प्रगती हाउसिंग सोसायटी येथे ग्रीनजीम व वाल कंपाऊंड बांधणे आदी विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, नगराध्यक्ष संजय इंदूलकर, उपनगराध्यक्ष नईम खान, युवक काँग्रेस विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष किरण पागेरे, जिल्हा उपाध्यक्ष उतम भोसले, नगरसेवक उमेश कस्तुरे, नगरसेविका रोशनी परदेशी, सुनील रोकडे, संपत डावखर आदींसह पदाधिकारी उपस्थित हाते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news