

मनमाड, पुढारी वृत्तसेवा : मनमाड ,चांदवड तालुक्यात सायंकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांजन आणि रामगूळना नद्यांना मोठा पूर आला आहे. पूरपरिस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या घरांमध्ये शिरले आहे.
दरम्यान, या पावसामुळे मका, सोयाबीन, कांदा, कांदा बियाणे यांचे प्रचंड नुकसान होणार असून, काढणीस आलेला घास निसर्ग हिरावून घेणार असल्याच्या चिंतेत बळीराजा सापडला आहे. शहरात अजूनही पावसाची संततधार सुरू असल्याने पुराच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावरील पूल पाण्यात वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील दत्त मंदिर,आयुडीपी ,टक्कर मोहल्ला भागातील पूल गेले पाण्याखाली आहेत.
.हेही वाचा :