नाशिक : निवासी नायब तहसीलदारासह कोतवाल ३५ हजारांंची लाच घेताना जाळ्यात

file photo
file photo

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बिनशेती क्षेत्र करण्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या निफाड येथील निवासी नायब तहसीलदारासह कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. कल्पना शशिकांत निकुंभ असे निवासी नायब तहसीलदाराचे नाव असून, अमोल राधाकृष्ण कटारे असे कोतवालाचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३७ वर्षीय तक्रारदाराने त्याचे चुलत आजोबा व इतरांची पिंपळगावजवळील जागा बिनशेती करण्यासाठी विनंती अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने तयार केलेल्या प्रस्तावावर कार्यालयीन टिपणीवर स्वाक्षरी करून ते प्रकरण तहसीलदारांकडे सादर करण्याच्या मोबदल्यात निकुंभ यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोड करून त्यांनी ३५ हजार रुपयांची लाच घेण्याची तयारी दर्शवली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधककडे तक्रार केल्यानंतर विभागाने सापळा रचला. निकुंभ यांच्या सांगण्यावरून कटारे याने प्रशासकीय इमारतीतील पुरुष प्रसाधनगृहात लाच स्वीकारली. तेथेच कटारेला पकडण्यात आले. पोलिस निरीक्षक अनिल बागूल, गायत्री जाधव, पोलिस नाईक अजय गरुड, किरण अहिरराव, हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news