नाशिक : पंतप्रधान मोदी यांचा लाभार्थ्यांशी संवाद

नाशिक : केंद्र सरकारच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. समोर उपस्थित जनसमुदाय.
नाशिक : केंद्र सरकारच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. समोर उपस्थित जनसमुदाय.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरद़ृश्यप्रणालीद्वारे मंगळवारी (दि. 31) देशातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या परिसंवादाचे थेट प्रक्षेपण शालिमार येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, नीलेश शिंगी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी आदी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक व जिल्हास्तरावर राबविण्यात येणार्‍या केंद्र सरकारच्या 13 विविध कल्याणकारी योजनांमधील लाभार्थी व त्या योजनांचे नोडल अधिकारी हजर होते. केंद्र सरकारमार्फत राज्यांमध्ये राबविण्यात येणार्‍या प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, अमृत, प्रधानमंत्री स्वनिधी, एक राष्ट्र एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर, प्रधानमंत्री मुद्रा आदी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी दूरद़ृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news