नाशिक : ‘स्वराज्य’च्या शंभर शाखांचे आज उद्घाटन

संभाजीराजे
संभाजीराजे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रायगड जिल्ह्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही 'स्वराज्य'च्या शंभर शाखांचे उद्घाटन रविवारी (दि.30) स्वराज्यप्रमुख माजी खासदार युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते केले जाणार आहे. संभाजीराजे तीन दिवस नाशिक दौर्‍यावर असून, या दरम्यान त्यांच्या उपस्थितीत नाशिक शहरासह ग्रामीण भागांमध्ये विविध शाखा सुरू केल्या जाणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते करण गायकर यांनी दिली.

नियोजित कार्यक्रमानुसार रविवार, दि. 30 ऑक्टोबरला इगतपुरी तालुका, सोमवार, दि. 31 ऑक्टोबरला नाशिक शहरातील आडगाव, पंचवटी, नाशिकरोड यांसह पूर्व भागातील ग्रामीण गावातील तसेच मंगळवार, दि.1 नाेव्हेंबरला सिन्नर तालुक्यातील शाखांचे उद्घाटन केले जाणार आहे. संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटना ही शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य, सहकार या पंचसूत्रीप्रमाणे काम करत असून, या शाखेच्या माध्यमातून 'गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्याचा मावळा' या धोरणानुसार शाखा उभारण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात जालना, रायगड या जिल्ह्यातील शाखांचे उद्घाटन पार पडले असून, दुसर्‍या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील शाखेचे उद्घाटन होत आहे. या उद्घाटनाप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप, केशव गोसावी, शिवा तेलंग, रूपेश नाठे, शिवाजी मोरे, प्रा. उमेश शिंदे, प्रमोद जाधव, ज्ञानेश्वर थोरात, नवनाथ शिंदे, विजय खर्जुल, आशिष हिरे आदींनी केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news