Nashik : चांदवडला राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध

अब्दुल सत्तार यांचा निषेध,www.pudhari.news
अब्दुल सत्तार यांचा निषेध,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा :

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार, उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे यांच्यावर अभद्र भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादीकडून सत्तार यांचा निषेध करण्यात येत आहे. चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देऊन सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली.

कृषी मंत्री सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी तसेच सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादीने केली आहे.

या आंदोलनात चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा साधना पाटील, शहराध्यक्षा चित्रा शिंदे, युवकचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे, नगरसेवक नवनाथ आहेर, अल्ताफ तांबोळी, कल्पना शिरसाट, शहराध्यक्ष प्रकाश शेळके, सुनील कबाडे, शैलेश ठाकरे, अनिल पाटील, विक्रम जगताप, शिवाजी सोनवणे, संदीप शिंदे, कार्याध्यक्ष विजू नाना गांगुर्डे, अध्यक्ष विकी जाधव, सागर साठे, हरी निकम, रमेश वाकचौरे, चेतन देशमाने, अमोल शेलार, ऋषिकेश सोनवणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news