

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गॅलरीतून खाली पडल्याने प्रकाश विठ्ठल सूर्यवंशी (४७, रा. वाढणे कॉलनी, म्हसरूळ) यांचा मृत्यू झाला. रविवारी (दि. १०) मध्यरात्री हा प्रकार घडला. म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हे त्यांच्या घराच्या गॅलरीतून खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्याला भद्रकाली पोलिसांनी अटक केली. किशन रमेश नागपुरे (२८, रा. कुंभारवाडा) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित किशनने शनिवारी (दि. ९) सायंकाळी 6 च्या सुमारास मधली होळी चौक परिसरात पाठलाग करून विनयभंग केला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात किशनविरोधात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रकालीत शस्त्रांसह एक ताब्यात
नाशिक : धारदार शस्त्रे बागळणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. अमन नूरखान पठाण (२२, रा. भद्रकाली) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. तो तलवार व चॉपरसह फिरत असल्याचे कळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला रविवारी (दि. १०) सायंकाळी नानावली पटांगण येथून पकडले. त्याच्याकडून दोन्ही शस्त्रे जप्त केली असून, त्याच्याविराेधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :