नाशिक : व्हॉट्सॲपद्वारे मनपाची करवसुली

नाशिक मनपा,www.pudhari.news
नाशिक मनपा,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीचा डोंगर वाढत असताना दुसरीकडे करवसुलीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मनपाच्या कर आकारणी विभागाने व्हॉटस्अ‍ॅपच्या आधारे मालमत्ताधारकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कर आकारणी विभागाने सुमारे दीड लाख करदात्यांना व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून कर भरण्याचे आवाहन केले आहे.

मनपाच्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात जवळपास ४०० कोटींची तूट निर्माण झाली आहे. घरपट्टी, पाणीपट्टी महसुलातील घट या तुटीमागील एक कारण आहे. शहरात चार लाख ६६ हजार मिळकती असून, चालू आर्थिक वर्षात घरपट्टीचे उद्दिष्ट १५४ कोटी रुपये इतके आहे. २७ डिसेंबरपर्यंत १२४ कोटी ७३ लाखांचा कर वसूल झाला आहे. वसुलीचे प्रमाण चांगले असले तरी मागील कर थकबाकीचा आकडा मात्र कमी झालेला नाही. कर वसुलीकरिता ७५ हजार ९६२ थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

घरपट्टी, पाणीपट्टी कराचा भरणा करताना महापालिकेचे कर्मचारी करदात्यांचे मोबाइल क्रमांकही अपडेट करीत आहेत. मात्र, काही करदात्यांच्या मोबाइलला व्हॉटस्अ‍ॅप उपलब्ध नसल्यामुळे, तर काही करदात्यांनी नोंदविलेले संपर्क क्रमांक जुने वा बंद असल्यामुळे त्यांच्याशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करण्यात अडचणी येत आहेत.

पाणीपट्टी ३७ कोटीच वसूल

पाणीपट्टी वसुलीसाठी ७५ कोटींचे उद्दीष्ट असून, केवळ ३७ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या करवसुलीसाठी बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावतानाच व्हॉट्सॲपद्वारे कर भरण्याचे आवाहन केले आहे. व्हॉट्सॲपद्वारे १ लाख २४ हजार ७२७ मिळकतधारकांना घरपट्टी वसुलीसाठी, तर २७ हजार ५७४ मिळकतधारकांना पाणीपट्टी वसुलीसाठी संदेश पाठविले आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news