नाशिक : नवश्या गणपती मंदिरात भक्तांची मांदियाळी

पंचवटी : श्री नवश्या गणपती मंदिरात हरिपाठ कार्यक्रमात सहभागी झालेले अध्यक्ष राजाभाऊ जाधव यांच्यासह भाविक. (छाया : गणेश बोडके)
पंचवटी : श्री नवश्या गणपती मंदिरात हरिपाठ कार्यक्रमात सहभागी झालेले अध्यक्ष राजाभाऊ जाधव यांच्यासह भाविक. (छाया : गणेश बोडके)
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी)  : पुढारी वृत्तसेवा
श्री गणेशोत्सवानिमित्त गंगापूर रोडवरील श्री नवश्या गणपती मंदिरात भक्तांची मांदियाळी दिसून येत आहे. पहिल्याच दिवसापासून मंदिरात अभिषेक, आरती, पूजा, हरिपाठासह विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.

शहर, जिल्ह्यात दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदाचा गणरायाचा उत्सव अगदी धुमधडाक्यात सुरू झाला आहे. सार्वजनिक मंडळे, शासकीय-निमशासकीय, खासगी कार्यालयांत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. श्री नवश्या गणपती मंदिरात हरिपाठासह त्रिकाळ आरती, अभिषेक, पूजन आदी कार्यक्रम होत विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकदेखील मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेत आहेत. पहाटे 4 वाजताच हरिपाठाला भाविक हजेरी लावत आहेत. यावेळी श्री नवश्या गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव, विश्वस्त अरुण गलांडे, भटू शिंदे, धोंडीराम गलांडे, शिरीष मोहिते, ईश्वर जाधव, अविनाश जाधव यांच्यासह भाविक उपस्थित होते.

श्री नवश्या गणपती मंदिर परिसरात गणेशोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्रीगणेशाचे विसर्जन नवव्या दिवशी करण्यात येते. खूप पूर्वीपासूनची सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे. – राजाभाऊ जाधव, अध्यक्ष, श्री नवश्या गणेश मंदिर, गंगापूर रोड.

गणेश मंदिरे गर्दीने फुलली
रविवार कारंजा येथील सिद्धविनायक, संगीत गणपती, ढोल्या गणपती, इच्छामणी, मोदकेश्वरासह सर्वच गणेश मंदिरांत दर्शनासाठी गर्दी होत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news