या आशय पूर्ण एकांकिकेतील आदिल शेख लिखित आणि आदिल शेख-अमित शिंगणे दिग्दर्शित पाऊसपाड्या तर उत्तम लबडे लिखित आणि अमित शिंगणे- वैभव जैस्वाल दिग्दर्शित बट बिफोर लिव्ह एकांकिका आहे. याशिवाय या एकांकिकांमध्ये तांत्रिक बाजू सांभाळणारे आणि अभिनय करणारे हे नाशिकचे स्थानिक कलाकार आहेत. यानिमित्ताने नाशिकमध्ये खरा रसिक प्रेक्षक वर्ग तयार करण्याचे शिवधनुष्य सौंदर्य निर्मिती थिएटर, या संघाने उचलले आहे. प्रायोगिक रंगाभूमीला नवे वळण देणारे हे दोन्ही प्रयोग असतील अशी आशा सौंदर्य निर्मितीच्या प्रत्येक कलावंताला आहे. त्यासाठी सर्व नाट्य रसिकांनी या प्रयोगांना नक्की यावे असे आवाहन सौंदर्य निर्मितीच्या वतीने करण्यात आले आहे.