नाशिक : गुन्हेगारांची माहिती आता मिळणार एका क्लिकवर

जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात अंगुली मुद्रा कक्षाचे उद्घाटन करताना पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे. समवेत अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे आदी. (छाया: चेतन चौधरी)

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात अंगुली मुद्रा कक्षाचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

अँबिस संगणकीय प्रणालीमध्ये आरोपींच्या बोटांची ठसे पत्रिका, तळहाताच्या पत्रिका, छायाचित्रे, डोळ्यांचे बुबुळे हे सर्व डिजिटल स्वरूपात जतन करून गुन्ह्यात ठसे मॅचिंग करण्याची क्षमता आहे. संगणकीय प्रणाली राबविण्यात येत असून, राज्यासह देशातही हे कक्ष पहिले ठरले आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या संगणकीय प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये जवळपास 6 लाख 500 हजार गुन्हेगार व शिक्षापात्र आरोपींची माहिती संगणकीकृत करण्यात आलेले आहे. अँबिस प्रणाली ही पोलिस विभागात वापरण्यात येणार्‍या इतर संगणकीय प्रणालीशी जोडले जाणार आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्वइतिहास तपासण्यासाठी संगणकीय यंत्रणेचा उपयोग होणार असल्याची माहिती डॉ. मुंडे यांनी दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे, राखीव पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक वसंत कांबळे, पोलिस उपनिरीक्षक सचिन डोंगरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news