नाशिक : हुक्का पॉट, फ्लेवरसह ई-सिगारटेचा साठा जप्त


नाशिक: पानटपरीत प्रतिबंधित हुक्का पॉट, फ्लेवर, ई-सिगारेटच्या विक्रीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित टपरीचालक प्रकाश जाधव.
नाशिक: पानटपरीत प्रतिबंधित हुक्का पॉट, फ्लेवर, ई-सिगारेटच्या विक्रीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित टपरीचालक प्रकाश जाधव.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर रोडवरील नेर्लीकर चौक परिसरातील पानटपरीत हुक्का पॉट, फ्लेवर, ई- सिगारेटचा साठा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जप्त करत टपरीचालकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित प्रकाश जाधव (३५, रा. एरंडवाडी, पंचवटी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नेर्लीकर चौकात सावरकरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जय गणेश स्टोअर या टपरीत तंबाखूजन्य पदार्थांसहित हुक्क्याचे साहित्य आणि तंबाखूजन्य ई-सिगारेट विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखा एक युनिटचे सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांना देताच पोलिस पथकाने तेथे जात कारवाई केली असता ६२ हजार ९५० रुपयांचा प्रतिबंधित साठा आढळून आला. त्यानुसार संशयित जाधव विरोधात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९ चे उल्लंघन कलमासहित तंबाखू उत्पादने प्रतिबंध सुधारित अधिनियम २०१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल – पथकाने केलेल्या कारवाईत ५५ तंबाखूयुक्त ई-सिगारेट, ५० अल्टिमेट प्री लो कोन ब्राउन पेपर, ३० पाऊच फ्लेवर तंबाखू, ३ हुक्का पॉट, पाइप व फिल्टर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news