नाशिक : आणखी पाच मुली ‘त्या’ नराधमाच्या शिकार

नाशिक : आणखी पाच मुली ‘त्या’ नराधमाच्या शिकार
Published on
Updated on

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
म्हसरूळ शिवारातील द किंग फाउंडेशन संस्थेच्या ज्ञानदीप गुरुकुल खासगी वसतिगृहात 2018 ते 2019 पासून संशयित मोरे याने अनेक मुलींचा विनयभंग तसेच त्यांच्यावर वेगवेगळ्या बहाण्याने व वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार व अपकृत्य केल्याचे विद्यार्थिनींच्या चौकशीतून समोर आले आहे. यात चार अल्पवयीन, तर एका सज्ञान मुलीकडून वेगवेगळे पाच गुन्हे नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यातील एक गुन्हा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल होत आहे.

म्हसरूळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल खासगी वसतिगृहात 14 वर्षांच्या मुलीवर संशयित संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे (32) याने अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने तपासाला सुरुवात करीत अन्य मुलींचेही जाबजबाब नोंदविले असून, यात अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. मोरे याने मुलींना मध्यरात्री हातपाय दाबायला बोलावून हे प्रकार करत असल्याचे तसेच इतर मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. आरोपी हर्षल मोरे याने मुलींना आश्रमातून काढून टाकण्याची धमकी देत अत्याचार केल्याचे पुढे आले आहे. नववीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या मुलीवर मोरे याने बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर तिने जवळच्या नातेवाइकांकडे याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, सध्या मोरेची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या आश्रमातील सर्व मुलींची खोलवर चौकशी केली असता, काही मुलींबरोबर अपकृत्य झाल्याचे समोर आले असून, त्याबाबत आरोपीवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात येत असून, सखोल तपास सुरू आहे असे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news