पारगाव : कांदा लागवडींसाठी घरगुती रोपांनाच पसंती | पुढारी

पारगाव : कांदा लागवडींसाठी घरगुती रोपांनाच पसंती

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात रब्बी कांदा लागवडींना सुरुवात झाली आहे. लागवडीसाठी शेतकरी घरगुती रोपांनाच पसंती देत आहेत. पारगाव, शिंगवे, काठापूर, रांजणी, वळती, नागापूर या गावांमध्ये रब्बी हंगामात कांदा लागवडी शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. दोन वर्षांपूर्वी या भागात बहुतांशी शेतकर्‍यांना सदोष बियाणे मिळाले होते.

त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला होता. यंदा बहुतांशी शेतकर्‍यांनी घरीच वाफे तयार करून कांदा रोपे तयार केली. शेतकरी शेतमजुरांकडून लागवडीची कामे उरकून घेत आहेत. शेतमजुरांना जोडीला दिवसाची हजेरी सातशे रुपये द्यावी लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Back to top button