नाशिक : तोतया पोलिसांचा वृद्धाला गंडा

नाशिक : तोतया पोलिसांचा वृद्धाला गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पोलिस असल्याची बतावणी करीत दोघांनी मिळून वृद्धाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिंदेगावात बुधवारी (दि. २२) सकाळी ११.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. पिराजी तुळशीराम सोनवणे (७६, रा. मोरवाडी, अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते शिंदेगावात असताना दुचाकीस्वार भामटे त्यांच्या जवळ आले. आम्ही पोलिस असल्याचे सांगत भामट्यांनी सोनवणेंना बोलण्यात गुंतवून ठेवत सोनवणेंकडील सोन्याचे दागिने आणि रोकड असा २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज काढून नेला.

या प्रकरणी नाशिकरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत. दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news