नाशिक : नदीपात्रात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : नदीपात्रात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर रोडवरील बेंडकुळे मळा लगत नदीपात्रात युवकाचा मृतदेह आढळून आला. प्रथमेश रतन खैरे, (३०, रा. शुभम पार्क, डीजीपी, नगर कामाठवडे) असे या युवकाचे नाव आहे.

आनंदवली गाव शिवारातील बेंडकुळी मळालगत गुरुवारी सायकाळी ५.३० च्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर जखमा नसल्याची माहिती गंगापूर पोलिसांनी दिली. शव्विच्छेद्न् अहवालावरून मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news