

दिंडोरी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील मोहाडी येथे भरधाव वेगातील आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सह्याद्री कंपनीतील कर्मचारी ठार झाला आहे. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून आयशर चालकाविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. ८ जून) रात्री १० च्या सुमारास मोटर सायकल पल्सर MH.15. JE. 4342 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन माणिक मुरलीधर फसाळे व मंगला माणिक फसाळे रा. सह्याद्री कंपनी मोहाडी हे दोघे पती -पत्नी मोहाडी-दिंडोरी रस्त्यावरून जात होते. दरम्यान समोरुन भरधाव वेगात MH. 15. JC. 0343 या क्रमांकाचा आयशर टेम्पो आला व अनियंत्रित वेगात असलेल्या टेम्पोने फसाळे यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर माणिक फसाळे यांना जास्त मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी मंगला फसाळे या गंभीर जखमी झाल्या. आयशर चालकाविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो. ना. एस पी धुमाळ, उप पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड हे करीत आहे.
हेही वाचा :