नाशिक : कलावंत पुरस्कारांचे वितरण

नाशिक : पुरस्कारप्राप्त कलावंतांसह सुनील मोंढे, पी. कुमार धनविजय, राजश्री तुडयेकर, सोनाली रावळ, बाळासाहेब गोरे, सत्यनारायण जाधव, प्रा. सोमनाथ मुडाळ, सुनील भोसले, अशोक सूर्यवंशी, नूतन मिस्त्री, डॉ. प्रवीण नियत आदी.
नाशिक : पुरस्कारप्राप्त कलावंतांसह सुनील मोंढे, पी. कुमार धनविजय, राजश्री तुडयेकर, सोनाली रावळ, बाळासाहेब गोरे, सत्यनारायण जाधव, प्रा. सोमनाथ मुडाळ, सुनील भोसले, अशोक सूर्यवंशी, नूतन मिस्त्री, डॉ. प्रवीण नियत आदी.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रॉडक्शन व कमल म्युझिक प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लोककवी वामन दादा कर्डक, कवी वसंत बापट, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व शाहीर अमर शेख, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके स्मृती दिनानिमित्त परशुराम साइखेडकर नाट्यगृह येथे कलावंत पुरस्कार सोहळा पार पडला.

यावेळी स्वागताध्यक्ष सुनील मोंढे, कार्यक्रम अध्यक्ष पी. कुमार धनविजय, प्रमुख पाहुणे राजश्री तुडयेकर, अभिनेत्री सोनाली रावळ, बाळासाहेब गोरे, सत्यनारायण जाधव, प्रा. सोमनाथ मुडाळ, सुनील भोसले, अशोक सूर्यवंशी, नूतन मिस्त्री, डॉ. प्रवीण नियत आदी उपस्थित होते. डॉ. विद्याश्री मांडवकर यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर लेखन विभाग प्रा. दीपाली सोसे, लावण्या पुरस्कार पुरुष लावणी कलावंत किरण कोरो, अंबादा धुळे, बलाकलावंत पुरस्कार आर्यन पाटील, प्रथमेश मस्के, डॉ. देवीदास तारू, तजेला बगाडे, कवी रामचंद्र गुरव, छाया कांबळे, सतीश पाटील खरात, ऐश्वर्या कदम, संदीप दाते, आशू सुरपूर, कल्पना वाढे, निविदिता सावेकर, निलांबरी खामकर, जयकर ठोंबरे, कविता चव्हाण, कल्पना भावसार, रेणुका शहाणे, प्रीती राजपूत, जीवन मोहिते, शोभा मोरे, सविता चतुर, महादेव साळोखे, प्रकाश जाधव, मंजुषा काटकर, मोहिनी खोत, कविता राजवंश, राजेंद्र वाधाने, वसंत चोपडे, शोभा देशपांडे, शोभा मोरे, सुनीता रणदिवे, रेवणनाथ देशमुख यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news