Nashik : कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते अक्षरबंध साहित्य पुरस्कारांचे वितरण

कवी प्रकाश होळकर,www.pudhari.news
कवी प्रकाश होळकर,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा 

उत्कृष्ट साहित्यकृतींना अक्षरबंधने राज्यस्तरीय पुरस्काराच्या स्वरूपाने दिलेली कौतुकाची थाप साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरेल. अशा उत्कृष्ट दर्जाच्या पुरस्कारांमुळे महाराष्ट्राचे साहित्य वातावरण येत्या काळात निश्‍चितच बदलेले असेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व गीतकार प्रकाश होळकर यांनी केले.

अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे दहावा मैल ओझर येथे प्रकाश होळकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्यात वितरण झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक ऐश्‍वर्य पाटेकर, कवी व पत्रकार प्रशांत भरवीरकर, कवी विजयकुमार मिठे, विवेक उगलमुगले, प्रा. यशवंत पाटील, किरण भावसार, हेमंत राजाराम, अर्चना देशपांडे, राजू देसले, प्रा. डॉ. प्रकाश शेवाळे आणि प्रा. विद्या सुर्वे-बोरसे उपस्थित होते.

या साहित्य पुरस्कारांमध्ये औरंगाबाद येथील ज्योती सोनवणे यांच्या 'दमकोंडी' कथासंग्रहाला, पिंपळगाव येथील लक्ष्मण महाडिक यांच्या 'स्त्री कुसाच कविता' काव्यसंग्रहाला, औरंगाबाद येथील रमेश रावळकर यांच्या 'टिश्‍यू पेपर' कादंबरीला, मुंबई येथील डॉ.स्मिता दातार यांच्या 'प्रभु अजि गमला' या चरित्र लेखनाला, मुंबई येथील वीणा रारावीकर यांच्या 'आकाशवीणा' या ललित वाङ्मयाला, नाशिक येथील राजेंद्र उगले यांच्या 'थांब ना रे ढगोबा' या बालसंग्रहाला, पुणे येथील प्रसाद ढापरे यांच्या 'इकिगाई' या अनुवादित पुस्तकाला आणि अमरावती येथील डॉ. राजेंद्र राऊत यांच्या 'लीळाचरित्रातील कथनरुपे' या समीक्षापर ग्रंथाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आले. पुरस्कारार्थींच्या साहित्यिकृतीचे स्वागत पालखीतून करण्यात आले.

तसेच सटाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक शंकर कापडणीस यांना 'अक्षरबंध जीवनगौरव पुरस्काराने', तर यवतमाळ पुसद येथील निशा डांगे-नायगावकर यांना 'अक्षरबंध साहित्यरत्न' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अक्षरबंधतर्फे झालेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी भगवंत ढोकणे, दत्तात्रेय चौधरी, शीतल वारुळे, योगेश विधाते, आबा शिंदे, सरोजिनी देवरे, ललिता बोंबले, नलिनी पगार उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, भास्कर ठोके, देवीदास चौधरी, सुरेश पवार, रवींद्र कांगणे, विलास गोडसे, अमोल दरेक, संजय गोरडे, पुंजाजी मालुंजकर, विठ्ठलतात्या संधाण, विजय राहणे, सुरेखा बोऱ्हाडे, तुकाराम ढिकले, किरण सोनार, किरण पिंगळे, विलास पोतदार यांच्यासह अनेक साहित्यिक आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सप्तर्षी माळी, प्रा. डॉ. निलेश घुगे, सुवर्णा घुगे, प्रीती जोंधळे, चारुशीला माळी, दीपाली मोगल, सचिन नवगिरे, आकाश बर्वे, अनुष्का माळी, अथर्व जोंधळे, गीतांजली माळी, गायत्री बर्वे आदींनी पुढाकार घेतला. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. डॉ. गणेश मोगल यांनी आभार मानले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news