पिंपरी : उद्योगनगरीत ख्रिसमसचा उत्साह | पुढारी

पिंपरी : उद्योगनगरीत ख्रिसमसचा उत्साह

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरातील चर्चमध्ये रविवारी ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चर्चमध्ये येशूच्या जन्माची गाणी, शुभसंदेश आणि शुभेच्छा यांनी ख्रिस्ती बांधवांचा आनंद द्विगुणित झाला होता. चर्चमध्ये नवीन कपडे परिधान करून उपस्थित होते. प्रार्थनेनंतर एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर प्रभू येशूच्या जन्मावरती आधारित नाटिका, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ग्रुप आणि सोलो डान्स सादर करण्यात आला. सर्वांना केकचे वाटप करण्यात आले. गोरगरिबांनादेखील अन्नदान व कपड्यांचे वाटप करण्यात आले.

हॉटेल, मॉल्समध्ये विशेष सजावट

शहरातील हॉटेल, मॉल्समध्येही ख्रिसमसनिमित्त विशेष सजावट करण्यात आली होती. ख्रिसमस ट्री, स्टार, माळा, रोषणाई यांनी हॉटेल व मॉल सजले होते. प्रवेशद्वारावर सांताक्लाज ग्राहकांना ख्रिसमस व नववर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत होता. फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपवर ख्रिसमसचे मेसेज दिले जात होते.

Back to top button