नाशिक : देवळाली गावात तडीपार गुंड जेरबंद ; विनापरवानगी होते वास्तव्य

नाशिक : देवळाली गावात तडीपार गुंड जेरबंद ; विनापरवानगी होते वास्तव्य

नाशिक : शहर व जिल्ह्यातून चार महिन्यांसाठी तडीपार केलेले असतानाही त्याने विनापरवानगी शहरात वास्तव्य केल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी गुंडास पकडले आहे. नितीन निवृत्ती बनकर (२५, रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. नितीन यास डिसेंबर २०२१ मध्ये तडीपार केले होते. तरीदेखील तो शहरातील देवळाली गावातील रोकडोबावाडी परिसरात शनिवारी (दि.५) फिरताना आढळून आला. उपनगर पोलिसांनी त्यास पकडले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news