युक्रेन संकट : रशियाने युक्रेनला अस्तित्वच संपविण्याची दिली धमकी | पुढारी

युक्रेन संकट : रशियाने युक्रेनला अस्तित्वच संपविण्याची दिली धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनला धमकी दिली आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर अमेरिकेसहीत पश्चिमेकडील अनेक देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांना रशियाला तोंड द्यावे लागत आहेत, त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे चिडलेल्या पुतीन यांनी युक्रेनला सांगितलं आहे की, “जगाच्या नकाशावर अस्तित्वच शिल्लक ठेवणार नाही.” (युक्रेन संकट)

रशियाला जागतिक अर्थव्यवस्थेच्या साखळीतून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने आणि पश्चिमेकडील देशांनी कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. विजा आणि मास्टरकार्ड यांनी रशियाला चलन व्यवहारातून निलंबित केले आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर आरोप लावलेला आहे की, युक्रेन ‘डर्टी बाॅम्ब’ तयार करत आहे. रशियाने स्थानिक माध्यमांच्या आधारे सांगितलं की, “युक्रेन चेरनोबिलमध्ये प्लुटोनियम आधारित अणवस्त्र म्हणजेच ‘डर्टी बाॅम्ब’ तयार करत आहेत. परंतु, याला सबळ पुरावा कोणताच नाही.

रशियाने केलेला आरोप खोडून काढत युक्रेनने असे म्हटले आहे की, “सोव्हिएत संघ तुटल्यानंतर आणि १९९४ नंतर परमाणू शस्त्रं सोडल्यानंतर परमाणू क्लबमध्ये पुन्हा सहभागी होण्याचा आमचा कोणताच विचार नाही.” इस्त्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट अचानक मास्कोला जाऊन पुतीन यांच्याशी तब्बल ३ तास चर्चा केली.

इस्त्राईल पंतप्रधान कार्यालयाकडून एक वक्तव्य करताना सांगितलं आहे की, ही अघोषीत बैठक अमेरिकेच्या बैठकीचे कारण आहे. पुतीन यांच्यानंतर युक्रेनच्या राष्ट्रपतींशी म्हणजेच झेलेन्स्कि यांच्याशीही नफ्ताली बेनेट यांची चर्चा झाला. इस्त्राईलनं आमच्या युद्धात मध्यस्ती करण्याची गरज नाही, असं झेलेन्स्की यांनी सांगितलं आहे. (युक्रेन संकट)

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा आज अकरावा दिवस आहे. भारतीय दुतावासाकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मोबाईल क्रमांक, स्थळाची माहितीसहीत तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन केलेले आहे. दूतावासाने यासाठी गुगल फाॅर्मदेखील जारी केले आहे. तो अधिकृत ट्विटरवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये नाव, पासपोर्ट नंबर आणि सध्याचं ठिकाण अशी माहिती भरून फाॅर्म सबमीट करण्यास सांगितले आहे.

पाहा व्हिडिओ : व्यथा कांदाटी खोऱ्यात राहणाऱ्या झोरे कुटुंबाची…

Back to top button