Nashik Crime : अॅमेझॉन कंपनीच्या गोदामात चोरी करणारा गजाआड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : अॅमेझॉन कंपनीच्या गोदामात चोरी करणारा गजाआड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अशोका मार्गावरील अॅमेझॉन कंपनीच्या गोदामात चोरी करणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या जोडीदाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. आदिल सय्यद (३८, रा. गोसावी वाडी) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चोरट्यांनी शुक्रवारी (दि. ८) मध्यरात्रीच्या सुमारास गोदामात चोरी करून ८ लाख ५७ हजार रुपयांची रोकड चोरली. पोलिसांच्या तपासात ही चोरी गोदामाचा सुरक्षारक्षक रामदास संतू टेमगर (४३, रा. विहितगाव) याच्यासमवेत मिळून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयित आदिलकडून १ लाख रुपयांची रोकड व मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news