नाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत

नाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेमार्फत शहरातील दिव्यांगांना मोफत बसप्रवास सुविधा देण्यात आली. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील दिव्यांगांनासुद्धा बसप्रवासात सवलत देण्याच्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या मागणीस मनपा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येत्या 1 डिसेंबरपासून त्यांनाही सवलत लागू करण्याचे आश्वासन सिटीलिंकने दिले आहे.

शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांगांना बस प्रवास सवलत नाकारण्यात आली होती. प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे प्रशासनाकडे ही सवलत ग्रामीण दिव्यांगांना देण्याची मागणी करण्यात आली होती. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रहार दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळाने सिटीलिंकचे व्यवस्थापक मिलिंद बंड यांची भेट घेतली असता 1 डिसेंबरपासून ग्रामीण दिव्यांगांना सिटीलिंकच्या बसप्रवासात सवलत देण्यात येणार असल्याचे बंड यांनी आश्वासन दिले.

यावेळी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष ललित पवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, कार्याध्यक्ष बबलू मिर्झा, उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी, शहराध्यक्ष दत्ता कांगणे, तालुकाध्यक्ष रवींद्र टिळे, सचिव पंकज सूर्यवंशी, सरचिटणीस प्रमोद केदारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news