नाशिक : गणेशोत्सवामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गांत बदल

वाहतूक मार्गात बदल,
वाहतूक मार्गात बदल,
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शहरात आनंदाचे वातावरण असून, गणेश देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. त्या पर्श्वभूमीवर भाविकांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी गणेशोत्सव काळात सायंकाळच्या सुमारास शहरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी याबाबत आदेश काढले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यावर्षी सार्वजनिक सण उत्सवांवरील निर्बंध घटले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात होत आहे. सार्वजनिक मंडळांनीदेखील आकर्षक देखावे उभारले आहेत. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी नाशिककर सहकुटुंब येण्याची शक्यता गृहीत धरून बाजारपेठांमध्ये गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गांत बदल केले आहेत. त्यानुसार शनिवार (दि.3) ते येत्या गुरुवारपर्यंत (दि.8) सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे बदल अमलात येतील.

वाहतूक मार्गांतील बदल असे:
→ निमाणी बसस्थानक येथून पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवारी कारंजा, शालिमारमार्गे जाणार्‍या शहर बसेस, जड वाहतुकीला प्रवेश बंद.

→ निमाणीकडून जाणार्‍या शहर बसेस पंचवटी कारंजा, काट्या मारुती चौक, संतोष टी पॉइंट, कन्नमवार पूल, द्वारका सर्कलमार्गे नाशिक, नाशिकरोड, अंबड, सातपूरकडे जातील.

→ सीबीएसकडून पंचवटीकडे जाणार्‍या शहर बसेस, जड वाहनांना अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे प्रवेश बंद.

→ सीबीएसकडून जाणार्‍या बसेस अशोकस्तंभ, रामवाडी पूल, मखमलाबाद नाका, पेठ नाका सिग्नल, दिंडोरी नाकामार्गे निमाणीकडे जातील.

→ मोडक सिग्नल, खडकाळी सिग्नल येथून किटकॅट चौफुलीकडे येणारी वाहतूक; कालिदास कलामंदिरमार्गे सुमंगल दुकानाकडे ये-जा करणारी वाहने सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, मोडक सिग्नलकडून सीबीएस सिग्नल या मार्गाचा वापर करतील.

हे मार्ग वाहतुकीसाठी बंद :
→ मोडक सिग्नल, खडकाळी सिग्नल ते कालिदास कलामंदिरामार्गे शालिमार.

→ सीबीएसकडून गायकवाड क्लास, कान्हेरेवाडीमार्गे किटकॅट, सुमंगल कपड्यांचे दुकानाकडे व किटकॅटकडून सीबीएसकडे ये-जा करणारी वाहतूक दोन्ही बाजूने बंद.

→ सरदार चौक ते काळाराम मंदिर रस्ता दोन्ही बाजूने बंद. मालवीय चौक ते गजानन चौक व गजानन चौक ते नाग चौक, नाग चौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते मालवीय चौक दोन्ही बाजूने बंद.

→ सारडा सर्कल-खडकाळी सिग्नल-शालिमारमार्गे सीबीएसकडे जाणारी वाहतूक बंद.

→ खडकाळी सिग्नल ते नेहरू गार्डनकडून मेनरोड व बादशाही कॉर्नरकडे जाणारा रस्ता.

→ त्र्यंबक पोलिस चौकी ते बादशाही कॉर्नरपर्यंतचा रस्ता.

→ गाडगे महाराज पुतळा ते धुमाळ पॉइंट ते मंगेश मिठाई कॉर्नर.

→ सीबीएसकडून शालिमार व नेहरू गार्डनकडे जाणारा रस्ता.

→ मेहेर सिग्नलकडून सांगली बँक सिग्नल – धुमाळ पॉइंट – दहीपुलाकडे जाणारा रस्ता.

→ प्रतीक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारा रस्ता.

→ अशोकस्तंभाकडून रविवार कारंजा तेथून मालेगाव स्टॅण्डकडे जाणारा रस्ता.

→ रविवार कारंजाकडून सांगली बँक सिग्नलकडे जाणारा मार्ग.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news