

नाशिक : अशोकस्तंभ परिसरात कारच्या काचा फोडून चोरट्याने सुमारे दोन लाख रुपयांचा किंमती ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.२०) घडली. याप्रकरणी तेजस अनिल साबळे (३०, रा. नायगाव रोड, सिन्नर) यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी त्यांच्याकडील कार अशोकस्तंभ परिसरात उभी केली होती.
त्यावेळी चोरट्याने कारची काच फोडून कारमधील कॅमेरा, लेन्स, फ्लॅश लाइट, मेमरी कार्ड, इतर साहित्य तर अनिकेत रोडे यांच्या कारच्या काचा फोडून कारमधून ३० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. चोरट्याने दोन्ही कारमधून एक लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.