पिंपरी : जातीवाचक शिवीगाळ; पाच जणांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : जातीवाचक शिवीगाळ; पाच जणांवर गुन्हा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 जून 2021 ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये वाल्हेकरवाडी चिंचवड येथे ही घटना घडली.

पती सागर शांताराम वाल्हेकर (वय 31) दीर मंगेश शांताराम वाल्हेकर, सासू, नणंद आणि जाऊ (सर्व रा. मातोश्री कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे : मिटकरींच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक

याबाबत पीडित महिलेने मंगळवारी (दि. 19) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी नांदत असताना आरोपींनी आपसांत संगनमत करून, बंगला, गाडी पाहून ही आपल्या घरात आली.

तिला दुसरा कोणी भेटला नसता. माझ्या पोराला फसवले, अवदसा माझ्या पोराच्या जिवावर उठली. फुकट आली घरात, असे म्हणून तिला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

प्रियांका आणि निकच्या लेकीचं नाव आलं समोर

तुझ्या माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये, नाहीतर घरात राहू नको, असे फिर्यादीला म्हणत घरातून हाकलून दिले. वेळोवेळी तिच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ केला. जातीवाचक शिवीगाळ देखील केली. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे तपास करीत आहेत.

Back to top button