नाशिक : सीतागुंफा भागात ‘जैविक बॉम्बहल्ला’!

नाशिक : सीतागुंफा भागात ‘जैविक बॉम्बहल्ला’!
Published on
Updated on

नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
वेळ सकाळी 11.15 ची. पंचवटीतील सीतागुंफा येथे दर्शनासाठी रांग लागलेली. 'जय सीता, राम सीता'च्या जयघोषाने अवघा परिसर भक्तिमय झालेला असताना दहशतवादी बॉम्बस्फोट घडवितात. त्यामुळे वातावरणात रेडिएशन पसरून भाविकांचा मृत्यू ओढावतो. क्षणार्धात होत्याचे नव्हते घडते अन् सर्वत्र उरतो केवळ आक्रोश. पुढील काही मिनिटांमध्ये एनडीआरएफ, पोलिस व यंत्रणा घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रण मिळवत हे मॉकड्रिल असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांंतर्गत केंद्र सरकार देशातील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी मॉकड्रिल घेत आहे. अशा स्थळांच्या ठिकाणी आण्विक, जैविक, रासायनिक व रेडिओलॉजिकल हल्ला झाल्यास परिस्थिती कशी हाताळायची याचे प्रात्यक्षिक केले जात आहे. गुरुवारी (दि.19) सीतागुंफा भागात जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने मॉकड्रिल घेण्यात आले. बॉम्बच्या माध्यमातून हवामानात रासायनिक रेडिएशन तयार करून हानी पोहोचविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

मॉकड्रिलदरम्यान सीतागुंफेच्या पुजार्‍यांनी बॉम्बहल्ला झाल्याची माहिती पंचवटी पोलिसांना दिली. अवघ्या काही मिनिटांत पोलिस दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनची टीम (एनडीआरएफ), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, गुन्हे शाखा, बॉम्बशोेधक व नाशकपथक (बीडीडीएस), अग्निशमन दल, होमगार्ड्स व शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एनडीआरएफच्या टीमने अवघ्या काही मिनिटांमध्ये वातावरणात रेडिएशन शोधून काढत ती बंद केली. त्यानंतर मृत व जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. या मॉकड्रिलवेळी पोलिसांनी परिसरातील दुकाने बंद करत संपूर्ण भाग सील केला.

बटालियन-5 कडून प्रात्यक्षिके
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. व उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांच्या मागदर्शनाखाली मॉकड्रिल घेण्यात आले. एनडीआरएफची पुणे येथील बटालियन-5 चे कमांडट अनुप श्रीवास्तव, उपकमांडट प्रमोदकुमार सिंह यांच्यासह टीममधील अन्य जवान मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह पोलिस व मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news