नाशिक : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

नाशिक : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या 4 लाख 89 हजार 622 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पुस्तके उपलब्ध होणार आहेत. शिक्षण विभागाकडून त्यासाठी 11 दिवसांपासून नाशिकमधून पुस्तकांचे वितरण सुरू आहे.
राज्याच्या शिक्षण विभाागतर्फे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरवली जातात. त्यात यात मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमांसह एकात्मिक पाठ्यपुस्तकांचाही समावेश आहे. पावसामुळे पुस्तकांचे वितरण करण्यात अडचण येऊ नये याची खबरदारी शिक्षण विभागाकडून घेण्यात आली आहे.

मोफत पुस्तके देण्यात येणार्‍या वर्गनिहाय विद्यार्थ्यांची संख्या अशी : पहिली 57 हजार 199, दुसरी 56 हजार 502, तिसरी 56 हजार 432, चौथी 58 हजार 942, पाचवी 63 हजार 698, सहावी 63 हजार 377, सातवी 67 हजार 383, आठवी 66,192. तसेच तालुकानिहाय मोफत पुस्तके मिळणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अशी : बागलाण 46,000, चांदवड 27 हजार 275, देवळा 18 हजार 293, दिंडोरी 40 हजार 949, इगतपुरी 25 हजार 536, कळवण 27 हजार 168, मालेगाव 51,157, नांदागव 35,277, नाशिक 25,244, निफाड 47,977, पेठ 20,322, सिन्नर 37,020, येवला 29669.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news