नाशिक : जिल्हा रुग्णालयात ९ वर्षात तब्बल ‘इतक्या’ जुळ्यांचा जन्म

नाशिक : जिल्हा रुग्णालयात ९ वर्षात तब्बल ‘इतक्या’ जुळ्यांचा जन्म
Published on
Updated on

नाशिक : गौरव आहिरे

जिल्हा शासकीय रुग्णालयात एप्रिल २०१४ पासून फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ६२ हजार ५६५ गर्भवतींची प्रसुती झाली आहे. त्यात १ हजार १२१ जुळ्या बाळांचा जन्म झाला असून दहा तिळ्यांनीही जन्म घेतला आहे. वैद्यकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रसुती नैसर्गिक पद्धतीनेच करण्यावर भर असल्याने सर्वाधिक जुळ्यांचा जन्मही नैसर्गिक पद्धतीने झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात आदिवासी बहुल तालुके असून त्या तालुक्यांसह जिल्ह्यातील सर्व रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी तालुका पातळीवर आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार आता बहुतांश उपचार तालुकास्तरावरच मिळत असल्याने गरजू रुग्णांना त्याचा फायदा मिळत आहे. तरीदेखील प्रसुतीसाठी ग्रामीण भागातील महिला जिल्हा शासकीय रुग्णालयावरच अवलंबून असल्याचे दिसते. तालुका स्तरावर प्रसुतीसाठी अद्यापही तज्ञ डॉक्टर आणि आवश्यक यंत्रणेचा अभाव दिसून येत असल्याने गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले जाते. त्यानुसार एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत जिल्हा रुग्णालयात ६२ हजार ५६५ मुलामुलींनी जन्म घेतला आहे. त्यात १ हजार १२१ जुळे आणि १० तिळ्यांचा समावेश आहे. नैसर्गिक प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयाची ओळख असून जुळ्यांचीही सर्वाधिक नैसर्गिक प्रसुती करण्यात आल्या आहेत. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत जन्मास आलेल्या जुळ्यांमध्ये २१८ मुले व २१० मुलींनी जन्म घेतला आहे.

दररोज सरासरी १९ प्रसुती

जिल्हा रुग्णालयात १ एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत एकूण ६२ हजार ५६५ महिलांची प्रसुती झाली. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी १९ प्रसुती होत आहेत. नैसर्गिक प्रसुती करण्यावर रुग्णालयाचा भर आहे.

मुदतपुर्व प्रसुती, वजन कमी भरणे किंवा इतर कारणांनी नवजात बाळास स्पेशल न्यु बॉर्न केअर युनिट (एस.एन.सी.यू) कक्षात उपचार केले जातात. त्यानुसार एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ३ हजार ४९१ मुले आणि ३ हजार ९१ नवजात मुलींवर उपचार करण्यात आले आहेत. तर जिल्हा रुग्णालयात १६५ पीडित अल्पवयीन मुलींचीही प्रसुतीही करण्यात आली आहे.

वर्षनिहाय जुळ्यांची माहिती (कंसात तिळ्यांची माहिती)

कालावधी जुळे

(एप्रिल ते मार्च)

२०१४ १११ (००)

२०१५ ११९ (०३)

२०१६ १२९ (०१)

२०१७ १२० (०२)

२०१८ ११६ (०१)

२०१९ ९८ (०३)

२०२० १३५ (००)

२०२१ १५७ (००)

२०२२ (फेब्रु.२०२३ अखेर) १३६ (००)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news