

नाशिक : पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जि. शेखर यांची देखील बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे येथून सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाईकनवरे व बी जी शेखर यांच्या नवीन पदस्थापना प्रतीक्षेत आहे. अंकुश शिंदे यांनी याआधी नाशिक ग्रामिणला पोलिस अधीक्षक म्हणून सेवा बजावली असून फुलारी यांनी याआधी नाशिक पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून सेवा बजावली आहे.