नाशिक : शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

नाशिक : शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू
Published on
Updated on
नाशिक (अंदरसूल) पुढारी वृत्तसेवा 
येवला तालुक्यातील दूगलगाव येथील पोलीस पाटील तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष भगवान साबळे यांचा मुलगा ओम भगवान साबळे (19) हा (दि. 26) आपल्या शेतातील शेततळ्यामध्ये पाणी पाहण्यासाठी गेला असता शेततळ्यामध्ये पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती तालुका पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या हवाली केला आहे. घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र केदार, संदीप दराडे करत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news