नाशिक : जिल्ह्यात नव्याने 23 कोरोनाबाधित

कोरोना
कोरोना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गुरुवारी (दि. 6) दिवसभरात 23 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी शहरात 14, ग्रामीण भागात नऊ बाधित आढळून आले आहेत. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात 73 सक्रिय बाधितांवर उपचार सुरू होते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही वाढवले आहे. तसेच खबरदारी म्हणून नागरिकांना मास्क घालण्याचे, कोरोनाबाधित आढळून आल्यास विलगीकरणात राहण्यास सांगितले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 36 लाख 28 हजार 277 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी 4 लाख 82 हजार 768 बाधित आढळून आले आहेत. त्यातील 4 लाख 73 हजार 791 बाधित कोरोनामुक्त झाले, तर 8 हजार 904 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी 95 संशयितांचा अहवाल प्रलंबित होता.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news